धाराशिव – समय सारथी
वेश्या व्यवसाय रॅकेटमधील मुख्य आरोपी लॉज मालक नितीन रेाहीदास शेरखाने याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली असुन त्याची रवानगी आता धाराशिव जेलमध्ये करण्यात आली आहे. 26 डिसेंबर पर्यंत 3 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पोलिसांनी शेरखाने याला कोर्टात हजर केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव येथील ‘निसर्ग गारवा’ लॉजवर छापा मारून अनैतिक देहव्यापार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता यात 4 महिलांची सुटका केली होती, या गुन्ह्यातील आरोपी नितीन शेरखाने याला धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घरातून अटक केली. वेश्या व्यवसाय रॅकेटमधील दलाल व लॉज मॅनेजरला ऑन द स्पॉट अटक केल्यावर त्यांनी शेरखाने हा मास्टर माईंड असल्याचे सांगत भांडाफोड केला.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन लॉजवर छापा टाकला.
लॉजमध्ये चार महिला आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे यांनी दलाल बालाजी चंद्रकांत गवळी यांनी माहिती दिली. लॉजचे मालक नितीन रेाहीदास शेरखाने यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.
मोबाईल फोन,नोंदीचे रजिस्टर,ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 रुपये माल हस्तगत केला.पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.