कोल्हापूर – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या गाडीला कोल्हापूर येथे अपघात झाला असुन त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एक जन जखमी झाला असुन मंत्री सावंत हे सुरक्षित आहेत.
कोल्हापूर नियोजित दौऱ्यावर असताना माझ्या गाडीला छोटासा अपघात झाला. आई महालक्ष्मी व जोतिबाच्या तसेच राज्यातील सर्व जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत अशी प्रतिक्रिया प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली.