कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख व परंपरा, अनेकांचे योगदान – जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे
धाराशिव – समय सारथी
65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवमध्ये संपन्न होणार असुन या स्पर्धेच्या मैदानाचा भूमिपूजन अर्थात आखाडा पुजन सोहळा आज जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी व ज्येष्ठ कुस्तीपटू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पैलवान, पंच यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक सूटचे अनावरण करण्यात आले.
कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख व परंपरा असुन त्याला अनेक लोकांनी जिवंत ठेवले आहे, कुस्ती खेळासाठी अनेकांनी योगदान दिले आहे ते मोठे असुन रोज कठीण परिश्रम केले जाते.सर्वांनी योग्य नियोजन करुन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव जिल्हा तालीम संघ, सुधीर अण्णा पाटील मित्र परिवार, हातलाई कुस्ती संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यावेळी आयोजक सुधीर पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,बाळासाहेब शिंदे,संजय दुधगावकर,नवनाथ जगताप,भाऊसाहेब उंबरे, अनिल काळे, आदित्य पाटील, अभिराम पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.
धाराशिव व लातूर जिल्हाधिकारी एकत्र असताना 25 नोव्हेंबर 1969 साली लातूर शहरात डालडा मैदान येथे या स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना मानाची चांदीची गदा मिळाली होती ते महाराष्ट्र केसरी ठरले होते. यावर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद हे धाराशिव जिल्ह्याला मिळाले आहे.
लाल माती व मॅट या 2 गटात या स्पर्धा होणार असुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारी व कुस्ती पैलवान यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. 5 दिवस या स्पर्धा चालणार असुन यात विजेत्यांना मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी 2 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत.
कुस्ती खेळाडू व कुस्ती प्रेमीसाठी महाराष्ट्र केसरी हा एक प्रकारचा कुंभ मेळावा असतो या स्पर्धेचे देशात आकर्षण असते. धाराशिव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत. माती 20 व मॅट 20 असे वेगवेगळे 40 गटसहभागी होणार असुन 950 मल्ल भाग घेणार आहेत.स्कर्पिओ एन व 1 लाख, 20 बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.
अर्जुनवीर काकासाहेब पवार, राहुल आवारे, रुस्तम हिंद अमोल बचूडे, अमोल भराटे,महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, राहुल काळभोर,विकी बनकर, चंद्रहास लिमगिरे, रावसाहेब मगर, भरत मेकाले, डबल महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, उप महाराष्ट्र केसरी मारुती विठ्ठलकर,परिषदेचे धवलसिंह मोहीते पाटील, काळासाहेब पवार, विजय भराटे याचा सत्कार करण्यात आला.