आमदार डॉ तानाजीराव सावंत यांची पाटीलांवर टीका व इशारा – वेठबिगार समजु नका
धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषदमधील सत्तेचा माज आम्ही खपवून घेणार नाही, वेठ बिगार समजल तर सहा महिन्यात सत्ता उलटून टाकू असा इशारा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा येथे दिला. सावंत यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचे नाव न घेता टीका करीत इशारा दिला. जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आहे.
सावंत यांनी यापुर्वी देखील जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन केले होते त्यामुळे त्याच्या भुमीकेला व वक्ताव्याला विशेष महत्व आहे, पाटील व सावंत या सत्ता संघर्ष सर्वज्ञात आहे. भाजपच्या काही नाराज सदस्यांनी काही महिन्यापुर्वी आमदार सावंत यांची पुणे येथे भेट घेतल्याची माहिती आहे, त्यातच सावंत यांनी सत्तापरीवर्तनाचे वक्तव्य केले आहे. स्पष्ट बहुमत असले तरी अनेक सदस्य नाराज आहेत. 3 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असुन त्यात शिवसेना व सावंत गटाची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी अडचणीत सांगितल्या, जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाचा गटनेता विकी चव्हाण इथे आहे. मी सदस्यांना सांगतो की कुठलीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण वेठबिगार नाहीत, आपल्या जीवावर सत्ता आलेली आहे आणि वेठबिगार पद्धतीने तुम्हाला जर वागणूक दिली तर तिथे निषेध नोंदवून बाहेर पाडायचे, 6 महिन्यात जिल्हा परिषदेत परिवर्तन करून सत्ता उलथवुन दाखवतो असे सावंत म्हणाले.
कुठलाही माज आम्ही खपवून घेणार नाहीत, आमच्या जीवावर सत्ता आहे. जिल्हा परिषद आमचीही आहे त्या ठिकाणी हम करे सो.. असे चालणार नाही. जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी ठरवतील आणि त्यांना काय करायचे आणि काय नाही याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गदर्शन करतील, बाकीच्या लोकांनी यात तोंड घालायचे काही कारण नाही. अन्याय सहन करायचा नाही, आपणं चांगल्या पद्धतीने काम करीत दुष्काळाला सामोरे जायचे आहे असे सावंत कार्यकर्ते, पदाधीकारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या 55 जागा पैकी 19 जागावर भाजपने विजय मिळवीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला 7, 3 काँग्रेस, 4 अपक्ष, 1 समाजवादी पार्टीला मिळाली आहे. महायुतीला 40 जागा मिळाल्या असुन स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीला 10 व अपक्ष 4 व 1 समाजवादी पार्टी असे संख्याबळ आहे. खासदार ओमराजे हे उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर काही समर्थक त्यांच्या सोबत आहेत. अपक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाची भुमिका महत्वाची राहिली आहे.











