धाराशिव – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी कारवाई करत 9 व्या आरोपीला अटक केले आहे. 8 वा आरोपी रेवण नखाते यास ड्रग्स पुरवठा करणारा कळंब शहरातील समता नगर येथील अनिस अमरोद्दीन तांबोळी यास अटक केली असुन त्याला 13 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील केज येथुन रेवण सोपान नखाते या आरोपीला अटक केल्यानंतर तपासाला गती आली. या दोघांना 13 ऑक्टोबर पर्यंत कोठडी मिळाली आहे.
ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट हळुहळु उघड करण्यात पोलिसांना यश येत आहे. कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत असुन अनेक जण रडारवर आहेत. तपासाअंती आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होऊ शकतात. ड्रग्जचे सिंडीकेट हे बीड, केज, परभणी, पुणे या भागापर्यंत हे सिंडीकेट पसरले असुन त्याला काही स्थानिक नेत्यांचे ‘पाठबळ’ व ‘राजाश्रय’ मिळाला हे वास्तव आहे.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे,लखन गायकवाड, अक्षय रिटे, मोसीन सलीम मिर्झा,सुशांत सुतार व सागर किसन गराडे (जांभुळगाव ता.मावळ जि.पुणे) अश्या 7 आरोपीना कळंब ड्रग्ज तस्करीत अटक करण्यात आले असुन जेलमध्ये आहेत. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.
कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा व लखन विजय गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के मंडे यांनी फेटाळून लावत जामीन नाकारला आहे. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी सक्षमपणे बाजु मांडली. परभणी गुन्ह्यात देखील नगरसेवक मोसीन मिर्झा याचा सहभाग आढळून असुन तो परभणी जेलमध्ये आहे तर इतर आरोपी धाराशिव जेलमध्ये आहेत. ड्रग्ज तस्करीत आरोपी झाल्यानंतर शिवसेना उबाठा गटातून मिर्झाची हकालपट्टी करण्यात आली आहे.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कळंब ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाला. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करीत आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे सपोनि खटके, सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली होती.











