आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर अंबादास दानवेंची जाहीर टीका
धाराशिव – समय सारथी
पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण पेटलं असुन माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर ‘दिवट्या आमदार’ या भाषेत बाप काढुन भर सभेत टीका केली. रामदरा बंधाऱ्यात पाणी टाकून उजनीचे पाणी आले असे भासाविले गेले, त्यांच्या बापाने असे पाणी आणले होते का ? अशी टीका केली.
आमदार पाटील व डॉ पाटील यांच्यावरील टिकेनंतर आमदार पाटील समर्थकांनी अंबादास दानवे यांच्यावर नासका आंबा अशी टीका करीत प्रतिउत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तुझी लायकी काय? मागच्या दाराने आलास, औकातीत रहा अशी तंबी दिली.









