तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला असुन फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तुळजापूर पोलिस ठाण्यात रेहान अस्लम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी व आरोपी एकाच भागात राहत असल्याने ओळख पूर्वीपासून होती. आरोपीने काम असल्याचे सांगून तिला आपल्या घरी बोलावले, यावेळी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. आरोपीकडे असलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तुळजापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 65(1), 78, 351(2), 351(3) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 4 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक अन्नपूर्णा शामराव मस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.










