Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गटबाजी – आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांना डावलले, बसवराज पाटीलांचा सत्कार – काळे, चालुक्य नंतर गुंड

समय सारथी by समय सारथी
August 1, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

निष्ठावंतांचे तिकीट कापले, पत्नीला अध्यक्ष केले – विधान परिषदेला सुद्धा हव्यास होता, जशाच तसा मान सन्मान

धाराशिव – समय सारथी

धाराशिव भाजपात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सुर असुन एकामागुन एक अशी खदखद बाहेर पडत आहे. ऍड अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य नंतर आता प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकट गुंड यांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक बसवराज पाटील यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल गुंड यांनी भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित केला असुन त्या कार्यक्रमात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. उमरगा येथे सुद्धा पाटील यांना स्थान नव्हते.

काळे यांच्या बाबतीत जे घडले ते निषेधार्य आहे, पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजप कार्यकर्ता लांब चालला असुन त्यांना हेच अपेक्षित आहे. त्यांना भाजपात कार्यकर्ता नको असुन राष्ट्रवादी प्रमाणे स्वतःचे वयक्तिक समर्थक हवे आहेत असे ऍड व्यंकट गुंड म्हणाले. योग्य वेळी यावर पत्रकार परिषद घेऊन बोलेन असे ते म्हणाले.

आमदार पाटील हे भाजप प्राईव्हेट लिमिटेड पक्ष असल्यासारखे चालवीत आहेत, भाजप ही राष्ट्रवादी पक्ष नाही. त्यांनी आमच्या सारख्या इतर ज्येष्ठ सदस्यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद तिकीट प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणुन जाणीवपूर्वक कापले. आम्हाला त्यांच्या दारात जायची गरज नाही, आमची रोजी रोटी त्यांच्यावर अवलंबून नाही. ते मान सन्मान देत नाहीत, त्यांना आम्ही मान कां द्यावा, जशास तसे उत्तर दिले जाईल असे ऍड गुंड म्हणाले.

पक्षाच्या सुरवातीपासुन आम्ही काम करीत असुन हे गेली काही वर्षात येऊन पक्ष चालवीत आहेत. रामदास कोळगे यांच्या सारख्या नेत्याचे तिकीट कापले. आमदार खासदार यांनी घरात जिल्हा परिषदेचे तिकीट द्यायचे असे आदेश असताना राजहट्ट करून पत्नीला अध्यक्ष बनविले, पक्षाचे आदेश डावलले, पक्ष याची दखल घेत असतो. विधान परिषदेला सुद्धा घरात उमेदवारी देण्याचा हव्यास होता मात्र पक्षाने बसवराज पाटील यांना संधी दिली. बोगस कामे, गुत्तेदार जपून त्यातून संपत्ती कमवायची. त्यांच्या सोबत काही लाचार व रोजगारी लोकांची फौज आहे असा आरोप केला.

मतभेद असू शकतात, पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणी सक्षम नेतृत्व घडते. तुमची आमची, भाजपा सर्वांची अशी पोस्ट जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी केली होती मात्र नाराजीचा सुर कायम आहे.

आम्ही सर्वांनी 30 वर्ष संघर्ष केला असुन कोणी पक्षाचा मालक होण्याचे प्रयत्न करू नये मान सन्मान घ्यावा व मर्यादा पाळाव्यात. एकाच घरात 2 संविधानिक पदे, स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या मग कार्यकर्तेनी आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का ? मुख्य पदाधिकारी यांचे फोटो न टाकणे म्हणजे मनाचा कोतेपणा दर्शवितो मात्र त्याने फरक पडत नाही असे चालुक्य म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते जसे वागत होते तसे इथे वागत आहेत मात्र हे जास्त काळ चालणार नाही. कार्यकर्ते पेक्षा वैयक्तिक समर्थक वाढविण्यावर व पोसण्यावर भर दिला जात आहे. काही जणांचा राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणुन ठरवून पराभव केल्याचा आरोप चालुक्य यांनी केली.

पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यात एक कलमी कार्यक्रम सुरु असुन त्यांच्या सरंजामशाहीला अनेक जण कंटाळले असुन आम्ही आता सगळ्यांची मोट बांधत आहोत असे काळे म्हणाले. निष्ठावंत कार्यकर्ते हे यांचे लाभार्थी नसुन त्यांना मान आणि सन्मान हवा आहे. आमचा संघर्ष व तपस्या अमुल्य आहे, असे काळे म्हणाले.

Previous Post

शिस्त, प्रतिमा व सन्मान जपा – अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची पोस्ट

Related Posts

महाराष्ट्र

शिस्त, प्रतिमा व सन्मान जपा – अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची पोस्ट

July 31, 2026
महाराष्ट्र

मोर्चे बांधणी, गाठी भेटी – काळेनी घेतली ठाकूरांची भेट, नाराजी व्यक्त, रणनिती – ‘हॉली डे’ पॉलिटिक्स

July 30, 2026
महाराष्ट्र

समाधान शिबिर – 1 ऑगस्टला भूम येथे महाराजस्व अभियान, आखाडा बनणार, जिल्ह्याचे लक्ष

July 30, 2026
महाराष्ट्र

शाळेला कुलूप – शिक्षकाच्या रिक्त जागेसाठी उद्यापासून जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन

July 30, 2026
महाराष्ट्र

पडसाद, मालक बनू नका – मनाचा कोतेपणा, सतरंज्या उचलायच्या का ? माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य 

July 30, 2026
महाराष्ट्र

5 लाखांची खंडणी, विनयभंग – वैद्यकीय अधीक्षकांची तक्रार, 2 जणांवर गुन्हा नोंद

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गटबाजी – आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांना डावलले, बसवराज पाटीलांचा सत्कार – काळे, चालुक्य नंतर गुंड

August 1, 2026

शिस्त, प्रतिमा व सन्मान जपा – अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची पोस्ट

July 31, 2026

मोर्चे बांधणी, गाठी भेटी – काळेनी घेतली ठाकूरांची भेट, नाराजी व्यक्त, रणनिती – ‘हॉली डे’ पॉलिटिक्स

July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp