भ्रष्टाचारी, पवनराजे खुनामागे वेगळे रहस्य – पवनराजे मल्टीस्टेट माध्यमातून 500 कोटींची मालमत्ता
ईडीची चौकशी, घाबरून शिंदे गटात – बनावट खाती, गैरव्यवहार – भंगार विकून पैसे खाल्ले
पवनराजे मल्टीस्टेट कंपनीची 500 कोटींचे बॉंड खरेदी, ईडीमुळे पक्षांतर, सापाला दूध पाजले
धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे हे गद्दार, डरपोक, भामटा व सोंगाड्या असुन ते 100 कोटीला विकले गेल्याचा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी धाराशिव येथील सभेत केला. ओमराजे भ्रष्टाचारी असुन पवनराजे खुनामागे वेगळे रहस्य वेगळे आहे. पवनराजे मल्टीस्टेट माध्यमातून 500 कोटींची मालमत्ता जमा केली त्यामुळे ईडीची चौकशी लागली त्याला घाबरून ते शिंदे गटात गेले. बॅकेत सामान्य लोकांच्या नावे बनावट खाती काढुन मोठा गैरव्यवहार केला. तेरणा कारखान्याचे भंगार विकून पैसे खाल्ले, आम्ही 20 वर्ष सापाला दूध पाजले असे राऊत म्हणाले.
मी साधा ग्रामपंचायतचा सदस्य नव्हतो असे असताना मला आमदार आणि खासदार केले, मी कधीच साथ सोडणार नाही. आता काय केलेस रे भामट्या ? अश्या शब्दात संजय राऊतांनी प्रश्न विचारला. हा जो गद्दार याला मी भामटा आणि सोंगड्या म्हणतो. हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला. उमाच्या 100 शिवसैनिकांनी पत्र काढले आणि किडन्या विकून पैसे देतो असे म्हणाले. तू स्वतःच्या ताकदीवर खासदार झाला नाही तर हजारो शिवसैनिकांनी कष्ट केले आणि अनेकांनी त्याग केल्याचे राऊत म्हणाले.
समाधान पाटीलची हत्या झाली, ती कोणी केली तर शिंदेंच्या लोकांनी केली आणि हाच खासदार त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. मी पक्ष सोडू का असे त्याच्या आत्म्याला विचारलेस का नाही. या सोंगड्याला धाराशिवच्या रस्त्यावर उतरू देऊ नका तो म्हणतो विकासासाठी गेलो पण कोणाचा आणि काय विकास केला ? धाराशिवचा काय दुबई, सिंगापूर केली का काय केले ? तो का गेला ? तो गेला कारण त्याच्या बँकामध्ये पैसे जमा केले. हा डरपोक आहे.
आम्ही पंधरा-वीस वर्ष एका सापाला दूध पाजला आता त्याची नांग्या ठेचण्याची वेळ आली आहे. पवन राजे मल्टीस्टेट कंपनीने 500 कोटींच्या रकमेतून जमिनी खरेदी केल्या आहेत. ईडी चौकशी लागली म्हणून हा शिंदे गटात गेला. त्याच्या वडिलांच्या खुणा मागे काहीतरी वेगळे रहस्य आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला.












