धाराशिव – समय सारथी
27 जुन रोजी मल्हार पाटील यांचा वाढदिवस असुन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर 2029 चे भावी खासदार असा उल्लेख केला आहे. भाजप नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांनी याबाबत बॅनर लावले आहेत, त्यात सत्य, स्पष्ट नेतृत्व असे म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर चर्चेचा विषय ठरत असुन ‘टीम मल्हार’ ने आतापासून लोकसभेची तयारी व इच्छा व्यक्त केली आहे.











