धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात माजी गृहमंत्री डॉ पद्मसिह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असुन मारेकरी कोण हा हे समोर आले नाही. निंबाळकर यांची हत्या कोण केली हे समोर यायचे असेल तर हत्याकांडाची केस पुन्हा ओपन करावी व सेवानिवृत्त न्यायाधिशाच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. ओम राजे हे आता सत्तेत असुन त्यांनी तशी मागणी करून मारेकरी शोधावे व वडिलांना न्याय द्यावा असे ते म्हणाले.
20 वर्षात तपास लागला नसेल तर परत खोलात जाऊन तपास व्हायला हवा हवा, सीआयडी व सीबीआय हे सांगकामे लोक आहेत त्यामुळे न्यायाधीश यांच्याकडुन तपास व्हावा असे माझे मत आहे, त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाने मागणी करावी असे पवारपत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, रोहित बागल, अविनाश जाधव, योगेश सोनने यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
पाटील व निंबाळकर या 2 परिवारात वाद असल्याने दुसरा पर्याय दिल्याशिवाय विकास होणार नाही, राष्ट्रवादी पक्षात कोणीही बी टीम नाही, नगर परिषद निवडणुकीत यश मिळविले. ‘बी टीम’ बाबत पुढील काळात आवश्यक ती काळजी घेऊ असे ते म्हणाले.
कर्जमाफी अद्यादेश काढला त्यातील अटी ह्या जाचक होत्या, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले याच आनंद आहे मात्र अटी घालत असाल तर योग्य नाही. जाचक अटी काढाव्यात अशी मागणी होती त्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले, आश्वासन दिले. त्यावेळी सांगितले की मागण्या योग्य आहेत मात्र जे शब्द दिले ते पाळले गेले नाही. 30 जुनला कर्जमाफी लागू होईल त्यामुळे त्यापूर्वी बदल करण्यासाठी 29 जुनला आंदोलन करीत आहे.











