धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात ओके पॅटर्न अशी ओळख असलेली जोडी तुटली असुन ओमराजे शिवसेना शिंदे गटात गेले आहेत तर आमदार कैलास पाटील हे शिवसेना ठाकरे गटात कायम आहेत. या दोघांचे राजकीय मार्ग बदलले असुन काही कार्यकर्ते ओमराजे यांच्या सोबत गेले असुन काही जण कैलास पाटील यांच्यासोबत आहेत.
“ही दोस्ती तुटायची नाय..” पण राजकारणात कधी काहीही होऊ शकते, एकमेका विरोधी राजकीय भुमिका घ्यावी लागते. हे पुन्हा एकदा समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर व आ कैलास पाटील यांच्या कार्यपद्धतीस त्यांच्या नावाच्या अद्याक्षरावरुन ‘ओके पॅटर्न’ म्हणून संबोधले जात होते. त्यांची जोडी म्हणजे एकाच नाण्याच्या जणू दोन बाजू… मात्र आता ‘ओके’ मधील ‘ओ’ आऊट झाले असुन के कायम आहे. त्याला आर जोडले गेले आहेत त्यामुळे के-आर जोडी बनली आहे. आर हे रणजित पाटील यांच्या रूपाने जोडले जात आहे.
राजकारणात एकविचाराने, एकमुखाने, एकाच पद्धतीने काम करणाऱ्या या जोडीची आता राजकीय ताटातूट झाल्याने अनेक जिवाभावाचे शिवसैनिक वेगवेगळ्या विरोधी भूमिकेत आहेत.












