धाराशिव – समय सारथी
महायुतीवर मतदारांचा विश्वास असुन यात आपला विजयी निश्चित असुन विक्रमी मतांनी विजयी होऊ असा विश्वास उमेदवार बसवराज पाटील यांनी व्यक्त केला. चांगली माणसे चांगला विचाराला समर्थन देण्यासाठी येत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. खासदार ओमराजे महायुतीत आल्यावर त्यांचे स्वागत करू असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नगर परिषद, जिल्हा परिषद सक्षम करण्यासाठी अनेक कामे झाली असुन मदत करण्याची भुमिका आहे त्यामुळे मतदार महायुतीच्या मागे आहेत. महायुतीचा विजय निश्चित असुन विक्रमी मतांच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चांगली माणसे चांगला विचाराला समर्थन देण्यासाठी येत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. येणाऱ्याचे मनापासून स्वागत केले पाहिजे, पक्ष जे निर्णय घेतात ते चांगले निर्णय असतात, खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीत आल्यास त्याचे स्वागत करू असे ते म्हणाले.











