धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील पंचायत समितीकडून समता नगरकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषदेने नादुरुस्त वाहने भर रस्त्यात लावुन बंद केला. हा वाहतुकीचा रस्ता नागरिकांसाठी बंद केला, यापूर्वी देखील रस्ता तारेचे कंपाउंड व इतर मार्ग वापरून बंद केला होता मात्र शिवसैनिक व नागरिकांनी तारचे कंपाउंड काढुन रस्ता खुला केला. त्यानंतर मात्र जिल्हा परिषदेने बंद पडलेली जुनी वाहने विशेष क्रेन लावुन रस्त्यावर लावण्यात आली.
तारेचे कंपाउंड, पोल काढता काय? आता ह्या भंगार बंद गाड्या काढा, लावा ताकत असाच काहीसा तोरा यातून दिसतो. सार्वजनिक असलेला रस्ता बंद करण्याचा अट्टहास कोणाचा व कशासाठी ? नागरिकांचा रस्ता अडवून काय मिळणार ? काय सध्या होणार ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी याबाबतचे फोटो पोस्ट करून आडवा आडवी यासाठी सत्ता पाहिजे होती, आत्मिक समाधान शिवाय दुसरं काय साध्य होणार यांना अशी टीका केली आहे.












