धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल देण्यासाठी कोर्टाने 16 जुन ही तारीख ठेवली असुन निकाल देण्याची शक्यता आहे. या निकालाकडे राज्यासह कै पवनराजे निंबाळकर यांच्या सोबत काम केलेल्या सहकारी यांचे सुद्धा लक्ष आहे. गेल्या 20 वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा होती, ती आज संपेल व दोषींना योग्य ती शिक्षा मिळेल अशी प्रतिक्रिया संतोष खोचरे यांनी दिली. पवनराजे यांच्या आठवणी आजही ताज्या असुन हत्याकांडाबाबत बोलताना त्यांनी अनेक बाबींचा उलघडा केला.
संतोष खोचरे हे कै पवनराजे यांचे सहकारी होते, त्यांच्या अनेक बाबी, त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. पवनराजे यांच्या हत्येनंतर त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा सहायक म्हणुन काम केले. अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली मात्र खोचरे यांनी राजे परिवाराची साथ सोडली नाही. पवनराजे ते ओमराजे असा त्यांचा प्रवास आहे. दुहेरी हत्याकांडात न्याय मिळेल असं











