धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटाचे काही खासदार शिवसेनेच्या वाटेवर असुन त्यांचं पक्षांतराचं ठरलं आहे. 6 खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्षना पत्र दिल्यांची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची व त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती आहे. देशमुख यांनी भेट झाल्याची पुष्टी दिली मात्र भेटीचे कारण वेगळे सांगितले.
शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9 पैकी 7 खासदार फुटून शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्यातील एक खासदाराने असर्थता दाखवल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला केवळ 4 खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली.











