धाराशिव – समय सारथी
माहेरावरून 2 लाख रुपये घेउन ये म्हणून पतीने विवाहितेचा छळ करून गळा आवळत खुन केल्याची घटना उमरगा येथे घडली आहे. पलक दत्ता कांबळे (वय 22 ) हिचा पतीने खुन केला असुन पलकची आई केशर धनाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उमरगा पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असुन अटक करण्यात आली आहे. 2 वर्षांचा मुलगा पोरका झाला आहे.
पलक हिचे लग्न 3 वर्षांपूर्वी उजळंब (ता बसवकल्याण जि बिदर ) येथील दत्ता श्यामराव कांबळे (वय 27) याच्याशी झाले होते. दत्ता कांबळे हा दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. त्याला दुचाकी रिपेरिंगचे दुकान टाकण्यासाठी पैसे लागणार होते. यासाठी पत्नी पलक हिला माहेरून 2 लाख रुपये घेउन ये म्हणजे मानसिक व शरीरिक छळ करत होता. सासरच्या मंडळींनी व पती दत्ता याने तिला शिवीगाळ व नेहमी मारहाण करीत.
17 एप्रिल रोजी रात्री उशिरा पलक हिचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) ,80 व 85 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे करत आहेत.
पलकची आई, मामा राम गायकवाड, विष्णू गायकवाड आणि नातेवाईक केशर धनाजी शिंदे, मयुरी मस्के, आजोबा मनिक गोविंद गायकवाड, आत्या कविता मस्के यांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत.












