धाराशिव – समय सारथी
पत्नीस जिवे मारल्याच्या प्रकरणी पतीस जन्मठेप व 25 हजारांचा दंड धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांनी थोठावला आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी मांडलेला पुरावा व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3 मुलीनंतर मुलगा हवा या हव्यासापोटी आरोपीने पत्नीचा गळा चिरून खुन केला यात 10 वर्षाच्या मुलीने घटना पाहिली, तिची साक्ष महत्वाची ठरली.
आरोपी धनंजय माळी व त्यांच्या पत्नी मयतास 3 मुली होत्या मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन तिला धनंजय नेहमी त्रास देवुन मारहाण करत होता. परंतु आरोपी धनंजय माळी हा काहीही काम करती नसल्याने व तिला तीन मुली सांभाळणे अवघड जात असल्याने ती आता चौथे अपत्य होवु द्यायचे नाही असे तिच्या पतीला म्हणत होती. परंतु आरोपी धनंजय हा आपल्याला मुलगाच झाला पाहिजे या कारणावरुन नेहमी वाद घालत असते.
पप्पांनी आईचा गळा दाबुन तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केले आहेत व त्यावेळी साक्षीदार शिवराम राम माळी यांनी फिर्यादीस फोन करुन सांगितले की, तुमची बहीण गोजर धनंजय माळी हिला तिचे पतीने त्याचे राहते घरात तिच्या गळ्यावर वार केल्याने ती मयत झाली आहे. त्यावेळी मयत व आरोपीच्या तीन मुली आरडाओरड करुन रडत होत्या, त्यावेळी फिर्यादीने घरात जावुन पाहीले असता मयताच्या गळ्यावर मोठी जखम होवुन ती मयत अवस्थेत पडलेली दिसली.
फिर्यादीने मयताच्या मुलींना काय झाले असे विचारल्यानंतर घटना प्रत्यक्षदर्शी पाहणा-या मुलीने सांगितले की, “पप्पाने मला त्यांचे डोके दुखत असुन मी घरात झोपतो तु थोडा वेळ खेळायला बाहेर जा असे सांगुन त्यांनी आई असलेल्या खोलीचा दरवाजा आतुन बंद करुन घेतला व थोड्यावेळाने पप्पा व आईचा आरडाओरडा मला ऐकायला आला तेव्हा मुलगी तेथे गेली असता पप्पाने आईचा गळा दाबुन तिला मारहाण करीत होते व ते आईच्या गळ्यावर कोयता मारुन ते तेथुन पळून गेले आहेत.
सदरच्या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.डी. गिते यांनी करून आरोपी विरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षाच्या वतीने सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मांडलेला पुरावा, साक्ष ग्राह्य धरून शिक्षा सुनावली.












