धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी भेट घेत आशीर्वाद घेतले. मुंबई येथील सदिच्छा भेटी वेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीजितसिंह पाटील, मल्हार पाटील उपस्थितीत होते.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशाचा वृत्तांत सांगत पदाधिकारी यांनी आशीर्वाद घेतले, यावेळी डॉ पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, सुनील मालक चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, मजुर फेडरेशनचे चेअरमन सतीश दंडनाईक, नगरसेवक तथा गटनेते अमित शिंदे, शिवसेनेचे नुतन प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे, ऍड अनिल काळे. यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
सिंचन, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांनी धाराशिव जिल्ह्याची न पुसणारी ठळक ओळख निर्माण करणारे जिल्ह्याचे भगीरथ म्हणजे डॉक्टर पाटील अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.











