Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

रोखठोक भुमिका – 140 कोटींची निविदा नव्याने निघावी, पेरलेल्या ठेकेदाराने मंत्रालया पेक्षा स्पर्धेत भाग घ्यावा – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

समय सारथी by समय सारथी
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
527
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांचे 59 डीपी रस्ते करण्याचे कंत्राट ठेकेदार अजमेरा यांना देण्याच्या राज्य समितीच्या शिफारशीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी रोखठोक भुमिका घेत या सर्व प्रक्रियेला विरोध केला आहे. धाराशिवकरांचे आर्थिक नुकसान कोणत्याही स्तिथीत होऊ देणार नाही. ठेकेदार अजमेरा यांनी स्थानिक नेत्यांना मंत्रालयात घेऊन उंबरठे झीझवण्यापेक्षा नवीन निविदा प्रक्रियेत स्पर्धेत भाग घ्यावा व काम मिळवावे व चांगल्या दर्जाचे काम करावे असे म्हणत कान टोचले.

अजमेरा हा एका स्थानिक नेत्याने पेरलेला ठेकेदार असुन तो काय कामाचा दर्जा देणार ? असा सवाल उपस्थितीत केला. समितीने केलेली शिफारस ही बेकायदेशीर आहे, त्या गोष्टीचे आपण कधीही कोणत्याही स्तिथीत समर्थन करणार नाही. जे कोणी अधिकारी बेकायदेशीर करणार असतील तर त्यांनी विचार करावा हे खपवुन घेतले जाणार नाही. विधी व न्याय विभागाने यावर नियम पाहून निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री व इतरांना या प्रकरणातील वस्तुस्तिथी सांगितली गेली नसावी त्यामुळे आपण पालकमंत्री या नात्याने बाजु सांगू असे ते म्हणाले. 

अगोदरच या कामांना दीड वर्ष उशीर झाला आहे. रस्ते न झाल्याने धाराशिवकरांचे हाल होत आहेत. सुरुवातीला 15 टक्के जादा दराने निविदा मंजुर केली त्यामुळे नगर परिषद अर्थात नागरिकांचे 22 कोटी रुपये अतिरिक्त ठेकेदार अजमेरा यांना जाणार होते मात्र ती निविदा रद्द केल्याने ते पैसे वाचले आहेत, नवीन निविदा काढल्यास कमी दराने आले तर आणखी पैसे वाचतील असे ते म्हणाले. स्थानिक नेत्याने थोडं सबुरीने घ्यावे, प्रत्येक विकासात खोडा घालू नये, सरकार व जनतेचे पैसे वाचवण्यावर भर द्यावा असा सल्ला दिला.

गेली दीड वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे, धाराशिवकरांचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही. अजमेरा यांना निविदा दराने काम करावे यासाठी संधी दिली होती मात्र त्यांनी त्यावेळी नकार दिला, त्यामुळे आता तो प्रश्न येत नाही. टेंडर रद्द केले आहे, त्यात अनेक कायदेशीर बाबी आहेत बेकायदेशीर काहीही खपवून घेतले जाणार नाही. अजमेरा हा एका नेत्याने पेरलेला ठेकेदार आहे असे ते म्हणाले. 

राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने अजमेरा यांना काम देण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश यासह अन्य बाबीचा समितीने शिफारस करताना विचार केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका ‘सुसंस्कृत’ नेतृत्वाने हे टेंडर डी सी अजमेरा यांना देण्याचा ‘विडा’ उचलला आहे. धाराशिवची जनता, शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात दुःखी असताना टेंडररुपी ‘लोण्याचा गोळा’ खाण्यासाठी संधी साधत ‘डाव’ टाकला आहे.’दलाली’ नव्हे तर ‘भागीदारी’ असल्याने इतका जीवाचा ‘आटापिटा’ केला जात असल्याची चर्चा आहे. 

140 कोटीच्या प्रकल्पास 23 फेब्रुवारी 24 रोजी मान्यता मिळाली त्यानंतर 7 दिवसात निविदा काढणे व 3 महिन्यात कार्यादेश देऊन 91 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे बंधनकारक होते. ही कामे 18 महिन्यात पुर्ण केली जाणार होती मात्र दीड वर्ष होत आले तरी निर्णय झाला नाही. 119.49 कोटी राज्य सरकार तर नगर परिषद 21 कोटी रुपये लोकवाटा देणार आहे. राज्य समितीने शिफारस केली असली तरी सर्व कागदपत्रे व नियम पाहून कार्यवाही करावी असे म्हणत सर्व जबाबदारी व निर्णय मुख्याधिकारी यांच्यावर सोपवला आहे. 

Previous Post

मुख्यमंत्री यांचे निर्देश – 140 कोटींचे ‘कंत्राट’ अजमेरा यांना देण्याची समितीची शिफारस – ‘ही’ आहेत कारणे, निर्णयाचा ‘चेंडू’ मुख्याधिकारी यांच्या कोर्टात

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेंटल हेल्थ लॅबचे व छात्रमानस कक्षाचे उदघाटन 

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेंटल हेल्थ लॅबचे व छात्रमानस कक्षाचे उदघाटन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp