Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

रात्र वैऱ्याची आहे… मी तुमच्या साथीला खंबीर आहे – हार मानु नका, पुन्हा उभारी घेऊ

समय सारथी by समय सारथी
September 30, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
313
VIEWS

खचुन आत्महत्या करू नका, पाठपुरावा करून भरीव मदत घेऊ – खासदार ओमराजे निंबाळकर

धाराशिव – समय सारथी

रात्र वैऱ्याची आहे… मी तुमच्या साथीला खंबीर आहे. हार मानु नका, पुन्हा उभारी घेऊ, सरकारकडे पाठपुरावा करून भरीव मदत घेऊ मात्र खचुन आत्महत्या करू नका असे भावनिक आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ओमराजे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असुन त्यात त्यांनी भावना व्यक्त करीत आपण सोबती असल्याचे म्हणटले आहे.

अतिवृष्टीने सगळीकडे हाहाकार झालेला आहे. या पावसाने आणि पुराने होत्याचे नव्हते केले आहे. तुमचा हक्काचा माणूस म्हणून शक्य तिथे मी धाऊन जात आहे आणि ते माझे कर्तव्य आहे. आपण सर्व या पावसामुळे अतिशय हतबल झालो आहोत, तरी खचलो नाही आणि खचायचे पण नाही. सरकार दरबारी पाठपुरावा घेऊन तुमच्या पदरी भरीव मदत पोहचेल यासाठी माझे प्रयत्न चालूच आहेत आणि ते मदत मिळेपर्यंत चालूच राहतील.  

या दरम्यान आत्महत्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढले आहेत म्हणून एक नक्की सांगेल की आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नावर उत्तर नाही. जगात असे कोणतेही संकट नाही…  

जे आपण सोडवू शकत नाही. माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या परिवारासाठी तुमचे असणे खूपच गरजेचे आहे. म्हणून कृपया असा विचारही मनात आणू नका.

या संकटात तुम्ही एकटे नाही,तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमच्या बरोबर आहे त्यामुळे असा कोणताही विचार आणू नका.

रात्र वैऱ्याची आहे हे जरी खरे असले तरी मी तुमच्याबरोबर खंबीर पणे उभा आहे, हे ही नक्की आहे. आपण यातून ही उभारी घेऊ फक्त तुम्ही हार मानू नका असे भावनिक आवाहन करीत ओमराजे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

चौकट 

शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. अतिवृष्टीच्या प्रचंड तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात गेले प्रत्येक कुटुंबाच्या डोळ्यांत भविष्याबद्दलची चिंता आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. या संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी जबाबदारी आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आणि ग्रामस्थांचा विश्वास टिकवून त्यांचा आनंद परत आणण्यासाठी आम्ही सदैव लढा देत राहू असा प्रण केला.

Tags: #crop #insurance #farmer #list #rain #flood #heavyrain #dharashiv #leader #PoliticalNews
Previous Post

शिक्षक देणार पूरग्रस्तासाठी 1 कोटी – धाराशिव शिक्षक संघटना समन्व्य समितीचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

Next Post

नगर परिषद निवडणुक – मतदार यादी व मतदान केंद्र कार्यक्रम जाहीर, डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

नगर परिषद निवडणुक - मतदार यादी व मतदान केंद्र कार्यक्रम जाहीर, डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp