धाराशिव – समय सारथी
माणुस कोणत्याही पक्षात असुन द्या, ज्याची वृत्ती घाण असते, ज्याचे कार्य नीच असते अश्या माणसाशी मैत्री होऊ शकत नाही. 2019 मध्ये शिवसेना भाजप एकत्र असतानाही मी त्यांना विरोध केला होता. ओम राजे या वृत्ती व प्रवृत्तीला विरोधच करत राहणार असे म्हणत भुमिका स्पष्ट केली. ते मुंबई येथे पत्रकार यांच्याशी बोलत होते. सुसंस्कृत नेतृत्व, संस्कार विरुद्ध गद्दार असे म्हणत राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्ते यांनी ओमराजे यांना ट्रोल करीत टीका करायला सुरुवात केली आहे.
ओम सह सर्व 6 खासदारांचे मी महायुतीत मनापासून स्वागत करतो. ते राजकीय प्रतिस्पर्धी बिलकुल नाहीत, ते स्वतः महायुतीत आता आली आहेत ना असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले तर वेळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी 100 टक्के कार्यकर्ता म्हणुन आम्ही पुर्ण काम करू अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. ओमराजे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यावर डॉ पाटील यांच्या परिवारासाठी कदापि मते मागणार नाही, मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, असे म्हणाले होते. त्यावर पाटील पिता पुत्रांनी उर दिले.
माझ्या राजकारणात येण्याचे कारण मी काहीही लपवून, झाकून ठेवलेले नाही. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. इथून पुढे माझा विरोध कायम राहील आणि तो दिसुन येईल. मी शपथ घेऊन उतरलो होतो की अश्या नालायक लोकांचं राजकारण संपवल्या शिवाय मी शांत बसणार नाही, त्या शपथेशी मी प्रामाणिक आहे. ते भाजप मध्ये आले तेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा सुद्धा विरोध केला आहे आणि यापुढेही असणार आहे, असे ते म्हणाले.
मला 18 कोटी रुपयांचा खासदार निधी प्राप्त झाला असुन त्यातून 130 कामे प्रस्तावित केली आहेत, त्यातील 21 कामे पुर्ण असुन बाकी कामे प्रगती पथावर आहेत. लोकांच्या मनात संभ्रम 2019 ते 24 खासदार होती, निधी खर्च करायची मुदत 5 वर्ष असते, मुदत संपल्यावर निधी अखर्चित राहिला तर ते अपयश आहे मात्र माझा निधी खर्चित आहे.
लोकसभा कार्यक्षेत्रात 2 हजार 475 इतके बुथ असुन 5 वर्षात 25 कोटी निधी मिळतो त्या प्रमाणे प्रत्येक बूथला 1 लाख मिळतात. 1 लाखात काय व कोणते काम होते ? मतदार संघातील कामे करण्यासाठी सामान्य माणसाला दिली आहेत, अडचणी, समस्या काळात मी उभा राहिलो आहे.









