आषाढी एकादशी निमित्त येडशीतील यशराज नलावडेची अनोखी कलाकृती
धाराशिव – समय सारथी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील येडशी येथील यशराज सतीश नलावडे या युवकाने आपल्या कल्पकतेतुन 1 एकर पडीक जमिनीवर हिरव्या गवताच्या साहाय्याने विठ्ठलाची भव्य आणि आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. ही अप्रतिम कलाकृती तयार करण्यासाठी सुमारे 12 तासांचा कालावधी लागला. शेतात उभी राहिलेली विठ्ठलाची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या कलाकृतीचे कौतुक केले जात आहे. यापुर्वी देखील यशराज याने फायर आर्ट व विविध कलाकृती साकारली आहे.











