धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसीतुन सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असुन येरमाळा येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
भर पावसात मराठा समाज बांधव बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा व जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.