धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील संशयीत आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांच्या भाजप प्रवेशावरून वादंग उठले आहे. परमेश्वर हे राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ते पार्टीचे तुळजापूर येथील प्रमुख नेते होते असा दावा त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेल्या लेखी पत्रात केला आहे. संतोष कदम यांचा विधानसभा निवडणुकीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला असुन त्यात ते भाजपच्या स्वतःच्या पक्षाच्या विद्यमान आमदारावर आरोप करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे आमदार पाटील यांचा दावा खोटा ठरला आहे.
तुळजापूर विधानसभा निवडणुकीपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, त्या बैठकीत माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गेल्या 5 वर्षात कोणताही विकास न केल्याचे आरोप केला आहे. कागदावर नुसत्या पोकळ घोषणा झालेल्या आहेत. मी उघड उघड स्वतःच्या पक्षाच्या विद्यमान आमदारावर आरोप करतो आहे. 5 वर्षात आपण खुप मागे आलो आहोत, कागदावर फक्त घोषणाचा पाऊस पडलेला आहे. कोणताही निधी आलेला नाही. त्यासाठी आपल्या टीममधुन कोणीतरी एकाला आमदारकीला उभे करणे व आमदार बनविणे गरजेचे आहे व तसा निर्णय आम्ही केला आहे.
तुळजापूरचा विकास आमच्या टीमने, विशेष म्हणजे पिटू भय्या गंगणे यांनी विकास करुन दाखवला, उलथापालथ करुन दाखवली त्याचं पद्धतीने आता तालुक्याचा विकास साधायचा आहे आणि विकास होण्यासाठी आमदार होणे गरजेचे आहे. पिटू भय्या आमदार व्ह्याच नको म्हणाले म्हणुन आपणं दुसरे नाव घेतलं आहे त्यांची इच्छा नाही पण त्यांना आम्ही बळजबरीने तयार केले आहे असे त्या व्हायरल व्हिडिओत म्हणटले आहे.












