Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

आर्थिक व्यवहार, त्याच कंपनीला तीर्थक्षेत्राचे 436 कोटींचे काम देण्याचा घाट – महाविकास आघाडी

समय सारथी by समय सारथी
April 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
481
VIEWS

आमदार पाटीलांवर आरोप, तुळजापूरातही ‘लाडका ठेकेदार’, निवडणुकीत पैसे नेणारा ‘तो’ अधिकारी कोण?

धाराशिव – समय सारथी

जी कंपनी 156 कोटी रुपयांचे काम करू शकली नाही त्या कंपनीला तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचे 436 कोटी रुपयांचे काम देण्याचा घाट रचला जात असुन हे काम के एच कंपनीला मिळाल्यास आंदोलन, उपोषण करू. आम्ही कोणत्याही स्तिथीत यातून माघार घेणार नाही असा इशारा ऋषीकेश मगर व नगरसेवक अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला यावेळी त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. तुळजापूर निवडणुकीत एका वरिष्ठ अधिकारी यांच्या सुरक्षेत पैसे आणले गेले याची पोलखोल करणार असल्याचे ते म्हणाले.

खंडोबा बिरादार यांच्या के एच कॅन्स्ट्रकशन छत्रपती संभाजीनगर ह्यांना नगर परिषद निवडणुकीपुर्वी 2024 मध्ये नगरोत्तथान अंतर्गत 156 कोटी रुपयांचे काम दिले होते, त्यावेळी 2 निविदा आल्या होत्या. 5 टक्के कमी दराने काम केले. त्यांना 15 कोटी ऍडव्हान्स देण्यात आला. त्यांनी 30-35 कोटीचे काम केले त्यांना त्याचे बील सुद्धा देण्यात आले मात्र त्यांनी काम बंद केले, गेली दीड वर्षापासुन काम बंद आहे. सगळी यंत्रणा घेऊन ते निघुन गेले. 156 कोटी रुपयांचे काम घेण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे जोडली आहेत, देय बँक व्यवहार पुरावा नाही, सारा सोबत केलेले पोट करार नाही. राजकीय दबावापोटी काम मंजुर करून देण्यात आले.

निर्मनुष्य वस्ती व ज्या ठिकाणी एकही घर नाही त्या ठिकाणी रस्त्याची कामे करण्यात आली. खासगी लेआऊट आहे त्या ठिकाणी ही कामे झाले, प्लॉटिंग विकासकाने रस्ते नाली करण्याचा नियम आहे मात्र तिथे नगर परिषदेने काम केले. जिथे गरज आहे तिथे काम केले नाही. हुतात्मा स्मारक, नवीन न्यायालय येथील रोड केले नाहीत. प्राधिकरणचा निधी सरकारने काढुन घेतला आहे.

ह्याच कंपनीला पुन्हा 436 कोटी रुपयांचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम देण्याचा घाट आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घातला आहे. ज्या कंपनीने 156 कोटीचे काम केले नाही त्यांना पुन्हा हे काम का ? निधी उपलब्धता नसताना घाई केली जात आहे. नगरोत्तथानमधील कंपनी तीर्थक्षेत्र विकासात आहेत. या कंपनीला काम देण्यात विशेष रस दिसत असुन ठेकेदार लॉबी ते जपत आहेत त्यांना विकासाचे देणे घेणे नाही. आम्ही गप्प बसणार नाहीत यात आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप केला मगर यांनी केला. काम रद्द करून दंड करावा व काळ्या यादीत टाकावे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना याबाबत पुजारी, नागरिक घेऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले, हा श्रद्धेचा विषय असुन जनतेचा पैसा आहे. जितका निधी उपलब्ध आहे त्याच प्रमाणात कामे हाती घ्यावी. 70 हजार कोटीची देयके देणे बाकी आहे. आमदार पाटील यांचा राजकीय दबाव असल्याने तुळजापूर येथे दुसरी कंपनी यायला तयार नाही. खुली निविदा असली तरी अनेक गोष्टी मॅनेज केल्या जात आहेत.

जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीवेळी कोणत्या शासकीय यंत्रणेच्या गाडीत पैसे तुळजापूरमध्ये आले, याची पोलखोल पुराव्यासह देणार असुन त्यातील एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सुरक्षेत हे पैसे आणले गेले असा गंभीर आरोप केला त्यामुळे तो अधिकारी कोण ? याची चर्चा सुरु झाली आहे. कोणीतरी यावर बोलले पाहिजे.

मंदिरात पुरातत्व विभागाचे काम सुरु असुन अनागोंदी कारभार सुरु आहे. नगर परिषदेला जे यात्रा अनुदान मिळते त्यातून सुविधा करणे गरजेचे होते, ठीकठिकाणी मराठी, कन्नड, तेलगूसह इतर भाषेत दिशा दर्शक बोर्ड लावणे गरजेचे होते मात्र तसे केले नाही. काही ग्रामीण भागातील तरुण पुजारी म्हणुन येतात व भाविकांची लुट करतात याबाबत लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. आराखडा बाबत संभ्रम असुन लोकांना माहिती द्यावी, आम्ही लोकांपर्यंत विषय मांडले त्याचे उत्तर आमदारांनी भाविकांना द्यावे.

Previous Post

उच्च न्यायालयाचा आदेश, स्थगिती उठवली – महाकाली कला केंद्र, सील करण्याचा मार्ग मोकळा – याचिका मागे, कारवाईकडे लक्ष

Next Post

परवाना कायमस्वरूपी रद्द, सील करण्याचे आदेश – महाकाली कला केंद्र अखेर बंद होणार, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

परवाना कायमस्वरूपी रद्द, सील करण्याचे आदेश - महाकाली कला केंद्र अखेर बंद होणार, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp