Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पत्र – खासदार सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचे उत्तर, पुन्हा पाठराखण – म्हणे पोलिसांनी आरोपी केले..  तपास यंत्रणेवर गंभीर आरोप

समय सारथी by समय सारथी
November 19, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
900
VIEWS

धाराशिव – समय सारथी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपाला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे, त्यात त्यांनी पुन्हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची पाठराखण केली आहे. ड्रग्ज प्रकरणात ज्यांनी सहकार्य केले त्यांनाच पोलिसांनी आरोपी केले असे म्हणत आमदार पाटील यांनी तपास यंत्रणावर गंभीर आरोप केले आहेत. 

ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अजून धाराशिव पोलिसांचा तपास सुरु असुन 38 पैकी 2 आरोपी फरार आहेत, अंतीम दोषारोपपत्र गेलेले नाही. त्यातच आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रथमदर्शनी पर्याप्त पुरावे असल्यावर पोलिस आरोपी करतात हे आमदार यांना ठाऊक आहे. आमदार यांच्या म्हण्यानुसार गंगणे यांच्यावर पोलिसांनी अन्याय केला असेल तर ते गुन्हा रद्द करण्यासाठी / नाव वगळण्यासाठी कोर्टात का केले नाहीत असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. गंगणे हे मटका गुन्ह्यात आरोपी आहेत त्याच आमदार पाटील कसे समर्थन करणार हे पाहावे लागेल.

आमदार पाटील यांचे पत्र

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्रानुसार आदरणीय अजितदादा पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते.

आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित ‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय.

विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळं उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः मेसेज करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगणे यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत ? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच.

सौ. अंजलीताई दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमकं चुकीचं काय झाले आहे ? जरा आपण सांगू शकलात, तर बरं होईल ! म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय हे कळेल. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे. 

Previous Post

ड्रग्ज, मटका व राणा दादा – नगराध्यक्षपदासाठी भाजपकडुन विनोद गंगणे यांना उमेदवारी

Next Post

व्हिडिओ – संतोष परमेश्वर कदम यांचे वक्तव्य … मी भाजपचा… आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केले होते आरोप –  खरे खोटे कोणाचे ?  

Related Posts

महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
Next Post

व्हिडिओ - संतोष परमेश्वर कदम यांचे वक्तव्य ... मी भाजपचा... आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केले होते आरोप -  खरे खोटे कोणाचे ?  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp