परंडा – समय सारथी
परंडा येथे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सावंत यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, महायुती सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांमुळे प्रभावित होऊन अनेकजण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.