धाराशिव – समय सारथी
पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी या दुहेरी हत्याकांडात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांची सत्र न्यायालयाने सबळ पुरावे व संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली होती, त्या आदेशाच्या विरोधात सीबीआय आता कोर्टात गेली आहे.
2006 साली राज्यभरात हा हत्याकांडाने खळबळ उडाली होती, मुंबईतील सत्र न्यायालयाने सुनावणी अंती या 7 आरोपींची 20 जून रोजी निर्दोष मुक्तता केली होती. कै पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी सुद्धा या निकालाच्या विरोधात 18 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात आता कायदेशीर मुद्याचा कीस पडणार आहे. कोर्टाने काही मुद्दे गृहीत धरले नाहीत, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरु असेल असे हत्येकऱ्यांना व कृत्य करणाऱ्यांना माफी नाही अशी खासदार ओमराजे यांनी भुमिका स्पष्ट केली.
मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल कायद्याच्या दृष्टीने चुकीचा असून तो रद्द केला गेला पाहिजे. याप्रकरणावर या आठवड्यात न्यायमूर्ती एस. व्ही. कोटवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने डॉ पद्मसिंह पाटील आणि इतर सर्व निर्दोष सुटलेल्या आरोपींना नोटीस बजावली आहे.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर नावंदर यांच्या 316 पानी निकालात सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. पवन राजे यांना कोण व का मारले हा प्रश्न मात्र 20 वर्षानंतर अनुत्तारित राहिला. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीत अनेक बदल व त्रुटी असल्याने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉ पद्मसिंह पाटील,सतीश मंदाडे,मोहन शुक्ला,पारसमल जैन बादला ( माफीचा साक्षीदार ) दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी, कैलास यादव, ग्यानेंद्र छोटे पांडे शशिकांत कुलकर्णी हे IPC कलम 302, 120 ब व आर्म ऍक्ट 3,25 and 27 च्या आरोपातुन मुक्तता केली होती मात्र त्यावर अपील केले आहे.
दुहेरी हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील हे सर्वात कमी काळ 3 महिने 19 दिवस पोलिस व न्यायालयीन कोठडीत राहिले तर सर्वाधिक काळ दिनेश तिवारी हा शुटर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिला. तिवारी हा 15 वर्ष 11 महिने कोठडीत राहिला, त्या पाठोपाठ शुटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात राहिला. तिवारी व चौधरी हे एप्रिल 25 मध्ये सुनावणी दीर्घकाळ चालत असल्याने जामीनावर सुटले. माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी पारसमल जैन 14 वर्ष 6 महिन्यांनी सुटला.
निर्दोष मुक्तानंतर डॉ पाटील समर्थकानी ‘सत्यमेव जयते… साहेब’ अशी टॅग लाईन देत घरोघरी पोस्टर लावण्याची मोहीम राबवली होती. तब्बल 17 वर्षाच्या संघर्षानंतर डॉ पाटील यांना न्याय मिळाला, त्यांनी केलेल्या संघर्षाच्या गौरवासाठी आणि न्याय देवतेचे आभार मानण्यासाठी धाराशिव येथे गौरव समारंभाचे आयोजन केले होते मात्र नंतर मुख्यमंत्री यांनी कान टोचल्यानंतर ते बारगळले.
हत्याकांड विषयाशी काही संबंध नसताना राजकीय षडयंत्र रचण्यात आले, टप्या टप्याने काही गोष्टी समोर येतील. ही स्तिथी कशामुळे उद्भवली, हे षडयंत्र कोण व का केले, यात कोण कोण प्यादे होते. षडयंत्रकारी कोण याबाबत नंतर बोलेन, अतिशय चुकीची धाधंत विधाने केली जात होती. योग्य वेळी गरजेनुसार याबाबत बोलेन, बऱ्यापैकी माहिती मला आहे मात्र ते कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून दयायचे हे मी ठरवेल असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील निकालाच्या नंतर म्हणाले होते मात्र त्यानंतर ते गप्प आहेत.











