आनंदीदेवी निंबाळकर यांनी दिले आव्हान, नोटीसा जारी
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर समद काझी यांच्या हत्याकांडात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या निर्दोष सुटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असुन संबंधिताणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आई आनंदीदेवी निंबाळकर यांनी 18 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचा व कायदेशीर मुद्याचा किस पडणार आहे. कोर्टाने काही मुद्दे गृहीत धरले नाहीत, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरु असेल असे हत्येकऱ्यांना माफी नाही अशी खासदार ओमराजे यांनी भुमिका स्पष्ट केली.
उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचा व कायदेशीर मुद्याचा किस पडणार आहे. निकाल देताना कोर्टाने काही मुद्दे गृहीत धरले नाहीत, ते मुद्दे प्राधान्याने मांडणार असुन न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरु असेल. हत्येकऱ्यांना माफी नाही अशी खासदार ओमराजे यांनी भुमिका स्पष्ट केली.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर नावंदर यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. पवन राजे यांना कोण व का मारले हा प्रश्न मात्र 20 वर्षानंतर अनुत्तारित राहिला. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीत अनेक बदल व त्रुटी असल्याने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉ पद्मसिंह पाटील,सतीश मंदाडे,मोहन शुक्ला,पारसमल जैन बादला ( माफीचा साक्षीदार ) दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी, कैलास यादव, ग्यानेंद्र छोटे पांडे शशिकांत कुलकर्णी हे IPC कलम 302, 120 ब व आर्म ऍक्ट 3,25 and 27 च्या आरोपातुन मुक्तता केली होती मात्र त्यावर अपील केले आहे.
दुहेरी हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील हे सर्वात कमी काळ 3 महिने 19 दिवस पोलिस व न्यायालयीन कोठडीत राहिले तर सर्वाधिक काळ दिनेश तिवारी हा शुटर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिला. तिवारी हा 15 वर्ष 11 महिने कोठडीत राहिला, त्या पाठोपाठ शुटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात राहिला. तिवारी व चौधरी हे एप्रिल 25 मध्ये सुनावणी दीर्घकाळ चालत असल्याने जामीनावर सुटले. माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी पारसमल जैन 14 वर्ष 6 महिन्यांनी सुटला. डॉ पाटील यांना 6 जुन 2009 ला अटक झाली त्यानंतर 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.












