धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र सुरूच असुन सलग दुसऱ्या दिवशी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, दुःखाचा डोंगर असतानाही मराठा समाज बांधवानी त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन मुंबईकडे कूच झाले, आता नाही तर कधी नाही अशी भुमिका घेत मराठा आक्रमक झाला आहे.
कळंब तालुक्यातील हळदगाव येथील 22 वर्षीय प्रतीक रंजित सावंत या तरुणाने आत्महत्या केली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या तरुणाने चिट्ठी लिहीत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मी प्रतीक सावंत आत्महत्या करीत आहे, मराठा आरक्षण मिळलेच पाहिजे, मी माझे आयुष्य त्यासाठी संपवीत आहे तरी सरकारने दखल घ्यावी. एक मराठा लाख मराठा अशी चिट्ठी लिहली आहे.