नाशिक – समय सारथी
नाशिक महसुल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम यांनी वणी येथील सप्तश्रुंगी मातेचे सहकुटुंब दर्शन घेत विधिवत पुजा केली. सप्तश्रुंगी ही साडे तीन शक्तीपीठ पैकी एक पीठ असुन सध्या देवीचा नवरात्र उत्सव सुरु आहे. भाविकांना केंद्रबिंदु ठेवुन सप्तश्रुंगी देवीच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी डॉ प्रमिला गेडामसह दोन मुले व त्यांचा परिवार उपस्थितीत होता.
धाराशिवचे जिल्हाधिकारी असताना डॉ गेडाम यांनी तुळजाभवानी मातेची मनोभावे सेवा करीत मंदिर प्रशासनाने व सुविधा यात अमूलाग्र बदल केले होते. तुळजाभवानी देवीच्या जमिनी, सोने चांदी घोटाळा यासह अनेक चुकीचे प्रकार त्यांनी उजेडात आणले, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.