Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

विशेष लेखापरीक्षण – धाराशिव नगर परिषदेच्या कारभाराचे होणार ऑडिट, घोटाळा उघड होणार ?

समय सारथी by समय सारथी
October 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
226
VIEWS

तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड यांच्या अडचणीत वाढ, आमदार सुरेश धस यांची तक्रार

धाराशिव – समय सारथी

धाराशिव नगरपरिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला 27 ऑक्टोबर पासुन सुरुवात होणार असुन त्यासाठी लागणाऱ्या संचिका व इतर कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत असे पत्र स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक ज्ञानेश्वर सुळ यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना काढले आहेत. डिझेल घोटाळ्यासह अन्य प्रकरणातील तथ्य यातून बाहेर येणार आहे.

लेखा परीक्षणाचे काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या लेख्यांच्या संबंधातील सर्व प्रमाणके, किर्द, धनादेश, संचिका, आवश्यक नोंदवह्या, मोजमाप पुस्तीका, विवरणपत्रे, पत्रव्यवहार, टिपण्या किंवा इतर संबंधित सर्व दस्तऐवज विहीत वेळेत उपलब्ध करुन देण्यात यावे असे त्या पत्रात नमुद आहे. लेखापरीक्षकांनी दिलेल्या अर्धसमास पत्रामध्ये नमुद केलेल्या हरकती ताबडतोब निकाली काढाव्यात असे म्हण्टले आहे.  

आमदार सुरेश धस यांच्या मागणी व तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षण होत असुन तसे आदेश स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.

एकीकडे 140 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रकरणात कार्यारंभ आदेश काढावे यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यावर विविध राजकीय दबाव येत असताना दुसरीकडे धाराशिव नगर परिषदेच्या विशेष लेखापरीक्षणाचे आदेश येऊन ठेपले आहेत, तत्कालीन 2 मुख्याधिकारी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे करण्यात येणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप धस यांनी केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील परीक्षण होणार आहे. यलगट्टे यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना काही महिने जेलमध्ये राहवे लागले त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तर फड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली.

विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे. 

विशेष लेखापरीक्षणाचे कामकाज पुर्ण करुन व नमुद कालावधीचा विशेष लेखापरीक्षण अहवाल सहायक संचालक, धाराशिव यांनी पुनर्विलोकन करुन अंतिमीकरण करण्यासाठी सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, छत्रपती संभाजीनगर यांना विशेष लेखापरीक्षण पुर्ण होताच विनाविलंब सादर करावा असे आदेशात नमुद आहे.

Previous Post

सील – कालिका व गौरी कला केंद्र अखेर बंद – पंचनामा करून महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी

Next Post

140 कोटी कामांचा वाद – पालकमंत्री प्रतापराव सरनाईकांची 2 वेळेस तक्रार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश 

Related Posts

महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
महाराष्ट्र

गुंतवणूक परिषद – 37 उद्योग, 7 हजार 534 कोटींचे करार – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

August 25, 2026
महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 25, 2026
Next Post

140 कोटी कामांचा वाद - पालकमंत्री प्रतापराव सरनाईकांची 2 वेळेस तक्रार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp