Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

7 मिनिटांचा खेळ, कागदोपत्री ताळमेळ ? सर्वे, फोटोसेशन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात – ठेकेदार अजमेरावर गंभीर आरोप – 140 कोटी रस्ते काम

समय सारथी by समय सारथी
November 2, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.1k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

140 कोटी रुपयांच्या रस्ते कामाला राज्य सरकारने 28 ऑक्टोबर रोजी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने ‘स्थगिती’ देण्याच्या अगोदरच काम सुरु केल्याचे दाखवण्यासाठी अजमेरा या ठेकेदाराने केलेला एक कागदोपत्री ‘घोळ’ समोर आला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणाचा सर्वे करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरु केल्याचे अजमेरा यांनी दाखवले आहे. अधिकारी यांच्या उपस्थितीतीत फोटोसेशन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याची ही सगळी ‘मॅरेथॉन’ प्रक्रिया अवघ्या 7 मिनिटात झाली. 7 मिनिटात सत्तेचा खेळ… असे काहीसे आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 ऑक्टोबरला धाराशिव मुख्याधिकारी नीता अंधारे यांना सकाळी 11.57 वाजता फोन करून स्थगितीचे निर्देश दिले, त्यानुसार त्यांनी ‘वेळ’ नमुद करून ठेकेदार अजमेरा यांना पुढील आदेशापर्यंत कामास सुरुवात करू नये असे लेखी पत्र दिले मात्र त्या पूर्वीच काम सुरु केल्याचे अजमेरा यांनी दाखवले, त्यांनी 28 ऑक्टोबरचे काही जीपीएस फोटो जोडले, त्यानुसार त्यांनी तहसीलदार घर ते अजमेरा घर व ताज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल या 2 रोडचे काम सुरु केल्याचे दाखवले. अख्खे शहर खड्यात असताना हे दोन्ही रोड अजमेरा यांच्या घरासमोरील निवडल्याने ते या रस्ते योजनेचे खरे ‘नशीबवान’ व पहिले ‘लाभार्थी’ ठरले.

नगर परिषद प्रतिनिधी असलेल्या काही अधिकारी यांना सोबत घेऊन 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.42 ते 11.49 या 7 मिनिटांच्या काळात अजमेरा ठेकेदार यांनी या 2 रस्त्यावरील 6 ठिकाणी जीपीएस फोटो काढले, त्यावर तारीख, वेळ, दिशा नमुद असुन ते मुख्याधिकारी यांच्या पत्रासोबत जोडले आहेत. सर्वे फोटोसेशन करीत कामाला सुरुवात केली मात्र त्या ठिकाणी आता काम सुरु केले/ झाले याच्या कोणत्याही ‘खुणा’ दिसत नाहीत. कदाचित रस्त्यातील खड्यात त्या खुणा शोधण्यासाठी तज्ज्ञ ‘समिती’ नेमावी लागेल.

28 ऑक्टोबचे सगळे फोटो, प्रक्रिया संशयास्पद आहे, त्या दिवशी व ऑक्टोबर महिन्यातील अधिकारी, ठेकेदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासून चौकशीची मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केली आहे. स्थगिती अगोदर काम सुरु केले हे कोर्टात दाखवण्यासाठी केलेला ‘खटाटोप’ असाही आरोप त्यांनी केला असुन प्रसंगी या निविदा बाबत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा साळुंके यांनी दिला आहे.

अवघ्या 7 मिनिटात हे करण्याची ‘कला’ व ‘नियोजन कौशल्य’ जर ठेकेदार अजमेरा यांना ‘अवगत’ असेल तर ते पुरस्कारास पात्र ठरतात. त्यांचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यथोचित ‘नागरी सत्कार’ करायला हवा अशी मागणी होत आहे. अजमेरा यांना काम दिल्यास 59 रस्ते कामाच्या दर्जा व गुणवत्तेची जबाबदारी आमदार पाटील घेतली असुन ते या योजनेत एक प्रकारे ‘गुणवत्ता नियंत्रण’ अधिकारी ही दुहेरी भुमिका पार पाडणार आहेत. 

फोटोसेशन व प्रक्रियेवरील आक्षेप – 28 सप्टेंबर मुहूर्त का ? वेळेचा खेळ

1) ठेकेदार अजमेरा यांनी GPS व With out GPS फोटो जोडले आहेत त्यानुसार फोटोमधील फ्रेम एक सारखी आहे, हे फोटो edited असल्याचा आरोप होत आहे. एक फोटो काढला की दुसरा फोटो काढताना फ्रेम, हालचाली व मागील दृश्य बदलले मात्र इथे सगळे जणू काही ‘स्तब्ध’ झाले आहे.

2) सकाळी 11.42 ते 11.49 अश्या 7 मिनिटात GPS लोकेशन असलेले फोटो काढले आहेत. 2 रस्ते व ठिकाण अंतर पाहिले तरी सहज पायी चालत जायला किमान 4-5 मिनिट लागतात, यांनी 7 मिनिटात सर्वे व काम सुरु केले. 

3) 16 ऑक्टोबरला मुख्याधिकारी अंधारे यांनी कार्यादेश दिले त्यानंतर 28 ऑक्टोबरला म्हणजे 12 दिवसांनी काम सुरु करण्यासाठी मुहूर्त गाठला. अजमेरा यांनी दाखल केलेल्या फोटोनुसार एका फोटोत 20-25 टोपली खडी व एक जेसीबी दिसत आहे, पर्याप्त यंत्रणा नसताना काम सुरु केल्याचे दाखवले.

Previous Post

पत्नीची छेडछाड, जाब विचारायला गेल्यावर विजय राठोड यांना मारहाण – माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यासह 3 जणांवर गुन्हा नोंद

Next Post

बैठक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मुंबईत आढावा, धाराशिव रस्ते विकास प्रकल्प

Related Posts

महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

August 19, 2026
महाराष्ट्र

Breaking – कळंब ड्रग्ज तस्करीत नगरसेवक मिर्झा आरोपी, परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांड मंजुर

August 18, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपी जेलमध्ये, 1 वाढीव पोलिस कोठडी तर 1 निष्पन्न, कमर्शीयल क्षमता

August 18, 2026
Next Post

बैठक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मुंबईत आढावा, धाराशिव रस्ते विकास प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp