धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भुम परंडा मतदार संघांचे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची प्रकृती अचानक खालावली आहे. हृदयविकाराचा त्रास जाणवताच त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले असुन अँजिओप्लास्टी होणार आहे. शनिवारी सायंकाळी त्यांना तीव्र छातीत वेदना जाणवल्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत स्थिरता आली आहे.
रूबी हॉल क्लिनिकमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपचारासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.