धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी होणार आहे, त्यात 2 आरोपी फरार तर 2 आरोपी जेलमध्ये आहेत. 3 आरोपी सेवन गटातील तर 1 आरोपी तस्कर गटातील आहे. तस्कर गटातील फरार उदय शेटे, सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम, सेवन गटातील जेलमधील आबासाहेब पवार व माजी सभापती शरद जमदाडे अश्या 4 जणांच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी होणार आहे तर नियमित सुनावणी 17 जुनला होणार आहे.
दोषारोप पत्रात सेवन गटात असलेल्या आरोपींचा पोलीस तपासात सहभाग वाढला असुन कलम 29 मुळे जामिनीस अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत तर सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी असुन 20 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी 1 आरोपी निष्पन्न झाला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली असुन अलोक काकासाहेब शिंदे या एकाला अटकपूर्व जामीन दिली आहे.
फरार आरोपी (16) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 16 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारागृहातील आरोपी (19) – यातील अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर, रणजीत रंगनाथ पाटील, माजी सभापती शरद जमदाडे, आबासाहेब पवार, नानासाहेब खुराडे, शुभम नेप्ते हे 19 जण धाराशिव जेलमध्ये आहेत तर विनोद गंगणे यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु आहेत.