लाचलूचपत विभागाची कारवाई – भूम येथील नायब तहसीलदार अटकेत
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार पी.आर. राठोड यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात कारवाई सुरु आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात कोणी शासकीय कामे करण्यासाठी लाच मागत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.