दीड हजारांची लाच – बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक अटकेत
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागच्या भूम येथील कनिष्ठ सहाय्यक राजश्री उत्तमराव शिंदे यांना दीड हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या 91 हजार 257 च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली.
प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.मार्गदर्शक डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,औरंगाबाद.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले.सापळा पथकमध्ये पोअ दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके यांनी काम पाहिले.
कोणताही शासकिय अधिकारी व कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा असे आवाहन लाचलूचपत विभागाने केले आहे.