धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या विरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारला नामांतर करण्याचा अधिकार आहे असे सांगत याचिका फेटाळली आहे, यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा धाराशिव व छत्रपती संभाजीनगर हे नाव कायम ठेवत याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या नावावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाले आहे.
धाराशिव येथील नामांतर विरोधी कृती समितीतर्फे सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध आव्हान देणारी याचिका 5 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती या याचिकेवर शुक्रवारी 2 आगस्ट रोजी सुनावणी झाली त्यावेळी याचिका फेटाळली.
यापुर्वी उस्मानाबाद धाराशिव नामांतरण विरोधी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व अरिफ डॉक्टर या दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने फेटाळली, बाजूने धाराशिवचे सुपुत्र ऍड अमित मुंडे यांनी बाजु मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले गेले.
काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले व मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी नामातरण निर्णय पुन्हा घेतला.
धाराशिव शहरातील शेख मसूद इस्माईल , कादरखाॅन पठाण, खलील गफुर कुरेशी,अय्याज हरुन शेख (बबलू) , खलील साहेब सय्यद, असदखाॅन अश्रफखाॅन पठाण, इस्माईल बाबासाहेब शेख, निजामोद्दीन बडेमिया मुजावर (बाबा), वाजिदखाॅन हमिदखाॅन पठाण, बीलाल सलाऊद्दीन तांबोळी, अतिक अहेमद अ.बशीर शेख, सामियोद्दीन गुलाम सिद्दीक मशायक , इद्रिस हसन बशीर पीरजादे ( अफरोज) , इम्तियाज हसणं बागवान, इलियास रहमुतुल्ला पिरजादे, , काझी सय्यद कलीमोद्दीन इजहारोद्दीश ( एजाज) , इब्राहिम बाबा शेख , शब्बीर गवंडी , असेफ अली जमादार ई.नी उस्मानाबाद नामांतरण विषयी उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती.