पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा उद्या अतिवृष्टी पाहणी दौरा
उस्मानाबाद – समय सारथी
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.
शुक्रवारी 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता पालकमंत्री सावंत हे पुणे येथून हेलिकॉप्टरने निघून परांडा येथे सकाळी 10 वाजता आगमन व अतिवृष्टी भागाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी 11 परांडा येथून वाशीकडे प्रयाण व अतिवृष्टी भागाची पाहणी. सकाळी 12.30 ला वाशी येथून कळंबकडे प्रयाण व विविध कार्यक्रमास उपस्थितीत व अतिवृष्टी भागाची पाहणी करतील. दुपारी 2 वाजता कळंब येथून हेलिकॉप्टरने चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगरकडे प्रयाण करतील.