उपोषण मागे – अखेर 7 दिवसाच्या नंतर आमदार कैलास पाटील यांचे उपोषण मागे, अनेक मागण्या मान्य
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चानंतर निर्णय
उस्मानाबाद – समय सारथी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमदार कैलास पाटील आमरण उपोषण सोडणार आहेत. मागण्या बऱ्या पैकी मार्गी लागल्या आहेत त्यामुळे आमदार कैलास पाटील उपोषण तात्पुरते स्थगित करणार आहेत. फडणवीस व उद्धव ठाकरे यांना बोलल्यावर 7 दिवसाचे उपोषण मागे घेतले आहे.
खासदार ओम राजे निंबाळकर यांनी सांगितले की, उद्या सायंकाळ पर्यंत अतिवृष्टी बाबतचे नुकसानीचे 59 कोटी 87 लाख देण्याचा शासन आदेश येईल असे सचिवानी सांगितले आहे.सततच्या पावसाबाबत नुकसानीचे 222 कोटी 87 लाख पैसे द्यावे याची कॅबिनेट उपसमिती बैठकीत मंगळवारी निर्णय होणार त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.मागण्याप्रमाणे व शब्द दिल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा सुरु करणार असे ओमराजे म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री यांचे आभार मानले. विमा कंपनी विरोधात न्यायालयीन लढा व इतर अधिकार पूर्णपाने वापरून विमा कंपनीवर कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. शेतकरी यांचे सर्व विषय लोकप्रतिनिधी व प्रशासन हे एकत्र मिळून सोडवू असे ते म्हणाले.