धाराशिव – समय सारथी
सगेसोयरे अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मनोज जारांगे पाटील यांच्या आवाहनंतर धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ठीकठिकाणी सार्वजनिक रस्ता आडवुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 209 मराठा आंदोलकावर धाराशिव पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत. सांजा, शिंगोली, पारा, भुम, पारगाव, उमरगा, हिप्परगा, कळंब, बोरगाव वाशी, बेंबळी, रुईभर, वाघोली, मेडसिंगा, देवसिंगा व भुम अश्या 15 ठिकाणी सहभागी आंदोलक यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे येथे बाजीराव बप्पा सुर्यवंशी, सतिश बप्पा सुर्यवंशी,बालाजी सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, संताजी सुर्यवंशी,सागर शेळके,ज्ञानेश्वर सावंत,प्रविण काका कदम, ओम सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी सर्व रा. सांजा व पवन गाढवे, बाळासाहेब शिंदे, गणेश शिंदे,सुमित शिंदे,मुकेश शिंदे, जगदीश श्तिोळे, शशिकांत शिंदे, नागेश शितोळे, मनोज शिंदे सर्व रा. शिंगोली यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.