धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 7 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असुन त्या अनुषंगाने तयारीसाठी 2 फेब्रुवारी रोजी पदाधिकारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी दिली आहे. तेरणा कारखाना ढोकी येथे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात धाराशिव लोकसभा मेळावा होणार असुन तेरणा पुन्हा एकदा राजकीय सत्ताकेंद्र ठरणार आहे.
धाराशिव लोकसभा मेळाव्याच्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिंदे गटाने तयारी सुरु केली आहे त्यातच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः येणार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात जल्लोषचे वातावरण आहे. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षाची बैठक आयोजित केली आहे, तरी शिवसेना प्रमुख पदाधिकारी, सर्व शिवसैनिक,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सदस्य, युवासेना सर्व पदाधिकारी,महिला आघाडी सर्व पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत सर्व पदाधिकारी यांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.