धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असुन 100 ट्रकटर, रिक्षा घेऊन सांजा या गावातील नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या 20 जानेवारीच्या मुंबई येथील आंदोलनाची ही पुर्व तयारी असुन ट्रकटरला बंदी घातल्याचा निषेध तरुणानी केला आहे. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत आंदोलक निघाले आहेत.
मराठा समाजाचे हे गनिमी कावा आंदोलन असुन अचानक ट्रॅकटर रॅली काढली असुन हे सगळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले असुन तिथे आंदोलन करणार आहेत. ट्रॅकटरला परवानगी द्यावी अशी मागणी आहे. मुंबई येथील आंदोलनात सांजा गावातील किमान 1 हजार मराठा बांधव सहभागी होणार आहेत