धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन शिवाजीराव तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित ददा पवार यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, जनसेवेची परंपरा जपणे आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणे, या उद्देशाने पक्ष संघटनेत ही जबाबदारी सोपविण्यात आली असुन ती सक्षमपणे पार पाडू असे तावडे म्हणाले.यावेळी मनोज जगताप,आशिष पाटील, असद पठाण, इफ्तेकर मुजावर आदी उपस्थित होते
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क वाढविणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, अशी महत्त्वाची जबाबदारी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांच्यावर असणार आहे. आगामी काळात पक्षाची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.











