Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मटका किंग तुळजाभवानी गाभाऱ्यात – चौकशीच्या सुचना, कारवाईचे आमदार पाटीलांचे आश्वासन

समय सारथी by समय सारथी
October 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
176
VIEWS

पीक विमा व दिल्ली मुक्कामाचा आवर्जून उल्लेख मात्र घटनेच्या निषेधाचा विसर, सारवासारव

धाराशिव – समय सारथी

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील मटका किंग अरुण उर्फ दादा रोडगे याने थेट प्रवेश करून दर्शन घेत फोटोसेशन केल्याच्या प्रकरणात राज्यभर झालेल्या टिका व भाविकांच्या संतापानंतर आमदार तथा मंदीर संस्थान विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील यांनी सावध भुमिका घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. जिल्हाधिकारी यांना तश्या सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आमदार पाटील यांचा खासगी स्वीय सहायक या गुंडाच्या खास दिमतीला होता, त्याबाबत पाटील यांनी मात्र मौन बाळगले आहे. गाभाऱ्याच्या वादावर पडदा पडावा म्हणुन विषयांतर करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. पीक विम्याची चिंता असल्याचे दर्शविण्यासाठी ते दिल्ली येथे तळ ठोकून असल्याचे सांगण्यास विसरले नाहीत. भावनिक आधारासाठी पीक विमा व दिल्ली याचा त्यांनी आवर्जून प्रसिद्धी पत्रकात उल्लेख केला मात्र गाभाऱ्यातील प्रकार हा चुकीचा असल्याचे ‘धारिष्टय’ दाखवीत निषेध करण्यास कदाचित त्यांना विसर पडला असावा.

हातच्या काकणाला आरसा कशाला ? याप्रमाणे उघड उघड ते सर्व गाभाऱ्यात दिसत असताना आता आमदार कोणती चौकशी करणार हा प्रश्न आहे. गेली काही काळापासून त्यांनी मनमानी कारभार व मंदीराला खासगी मालमत्ता समजली आहे, जे की चुकीचे आहे. तुम्ही मुंबईतील ताज मध्ये आहेत की दिल्लीत याचे भाविकांना देणे घेणे नाही, कारवाईचा बोला ? पीएवर काय कारवाई करणार, कोणाच्या आदेशाने तो सोबत गाभाऱ्यात गेला, परिसरातील सीसीटीव्ही तपासा. पाठराखण व केवळ वेळ काढुपणा करण्यासाठी ‘हाताची घडी तोंडावर बोटं’ अश्या स्वरूपाची ही नाटकी दुटप्पी भुमिका असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील पिक विम्या बाबत सुनावणीच्या अनुषंगाने नवी दिल्लीत आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जो प्रकार घडला आहे त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना सूचना दिल्या आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी सोशल मीडियावरून कळविले आहे.

तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव सुरु असुन देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील एका गुन्हेगारी पार्शवभुमी असलेल्या मटका माफियाने व्हीआयपी दर्शन घेऊन मनसोक्त फोटोसेशन केल्याने खळबळ उडाली होती. राष्ट्रपती, मंत्री, शासकीय प्रोटोकॉल असलेल्या व्यक्तीसह सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना एका गुंडाला मात्र व्हीआयपी सेवा देण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी विश्वस्त तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक हे खास दिमतीला होते. आमदारांचे पुन्हा एकदा माफियाबाबत झुकते माप या निमित्ताने दिसुन आले.

भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिसांनी अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी मागणी केली आहे. अमरराजे कदम यांनी तक्रारीसोबत फोटो सुद्धा दिले असुन मंदीर कारभार व व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. जिथे सामान्य भाविकांना दर्शनासाठी तास तास उभे राहावे लागते, प्रसंगी धक्काबुक्की सहन करावी लागते अश्या वेळी एका गुंडासाठी मात्र पायघड्या घातल्या जातात.

सोलापूर येथील सराईत तडीपारीसारखी कारवाई केलेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे या मटका किंगने मंदिराचे सर्व नियम धाब्यावर बसवले. सदर व्यक्तीने महंत वाकोजीबुवा यांच्या मार्फत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खाजगी सहायक सुधीर जमदाडे आणि नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या मदतीने मंदिराच्या गाभाऱ्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून थेट देवीचे दर्शन घेतल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

Previous Post

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

Related Posts

महाराष्ट्र

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

October 14, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे उच्च न्यायालयात अपील – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पाटीलांसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

October 14, 2026
महाराष्ट्र

परभणी ड्रग्ज तस्करी, मिर्झासह 6 जणांचा जामीन मंजुर – कळंब गुन्ह्यात 2 आरोपीना वाढीव पोलिस कोठडी

October 13, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, कळंब ड्रग्ज तस्करी – 9 वा आरोपी अटकेत, 13 पर्यंत पोलिस कोठडी, पुरवठा करणारा जाळ्यात

October 10, 2026
महाराष्ट्र

जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – डान्स शिकविण्याचे बहाण्याने शिक्षकाने केला अत्याचार – आलम डान्स अकॅडमी

October 9, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 8 वा आरोपी अटकेत, कळंब पोलिसांची कारवाई, तपासाला गती, धागेदोरे हाती

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मटका किंग तुळजाभवानी गाभाऱ्यात – चौकशीच्या सुचना, कारवाईचे आमदार पाटीलांचे आश्वासन

October 14, 2026

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

October 14, 2026

सीबीआयचे उच्च न्यायालयात अपील – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पाटीलांसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

October 14, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp