धाराशिव – समय सारथी
धाराशिव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगर चा दुसरा भाग असल्याचा दावा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसणाऱ्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवले असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला होता.
आरोपाला प्रतिउत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे, ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असून ते प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी असे आरोप करतात, मात्र कैलास पाटील यांच्यावर त्याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते कुठे जातात, घरी कधी जातात, तुळजापुरला कधी जातात याची देखरेख ठेवली जाणार असून त्याच माहितीच्या आधारावर आम्ही ऑपरेशन टायगर यशस्वी करू असा मिश्किल टोलाही प्रतापराव सरनाईक लगावला.











