धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेला नवीन इमारत मिळण्याची आशा निर्माण झाली असुन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत आश्वासन दिले. पीपीपी मॉडेलचा प्रस्ताव सरकारकडे सादर करावा हा प्रस्ताव मान्य ण झाल्यास सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊ पण नवीन इमारत गरजेची असल्याने ती पुर्ण करू असे आश्वासन दिले.
आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून अनेक विकास कामे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्या कार्यक्रमात मंत्री गोरे यांनी आश्वासन दिले.
1990 च्या आसपास इमारतीचे बांधकाम झाले असुन ती आता जुनी झाली आहे त्यामुळे पीपीपी मॉडेल प्रस्ताव द्या, मान्य झाला तर ठिक नाही तर सरकारचा निधी वापरू. हा भाऊ जोपर्यंत आहे तो पर्यंत काही कमी पडणार नाही. चांगली इमारत बांधू काळजी करू नका असे गोरे म्हणाले.
धाराशिव जिल्हा परिषदेची विद्यमान इमारत आता अपुरी पडत आहे, नवीन इमारतीची मागणी जिल्हा परिषदेकडून आपल्याकडे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्ष सौ उषाताई रवींद्र गायकवाड या दोन्ही आमच्या भगिनी आहेत. त्यांची मागणी सकारात्मकरीत्या पूर्ण केली जाईल. विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळातच धाराशिवच्या ‘मिनी मंत्रालया’च्या नव्या इमारतीचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन इमारत, शासकीय अधिकारी, सभापती व सदस्य यांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असुन 240 कोटींचा डीपीआर जिल्हा परिषदेने तयार केला आहे. अनेक वेळा लांब राहणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांना उशीरापर्यंत जिल्हा परिषदेत थांबावे लागते त्यावेळी त्यांना निवासस्थान नसल्याने रात्री उशीरा परत जावे लागते. तसेच सर्व कार्यालये, अधिकारी व कर्मचारी निवास जवळ असल्यास वेळेची बचत व सुरक्षितता राहते. अध्यक्षा अर्चना पाटील. यांच्या संकल्पनातुन नवीन इमारत संकल्पना मांडली जात आहे.











