धाराशिव – समय सारथी
वेळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी 100 टक्के कार्यकर्ता म्हणुन आम्ही पुर्ण काम करू अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यावर डॉ पाटील यांच्या परिवारासाठी कदापि मते मागणार नाही असे म्हणाले होते. तुम्ही त्यांच्यासाठी मत मागणार का असे मल्हार पाटील यांनी विचारल्यावर ते म्हणाले की आपण महायुती बळकट करण्यासाठी मते मागू.
अनेक जण म्हणतात की मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे त्यासाठी निर्णय घेत आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, त्या कुटुंबाला मतदान करा असे मी म्हणणार नाही, त्यांच्यासाठी मत मागणार नाही असे खासदार ओमराजे म्हणाले होते.
बसवराज पाटील हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आले व त्यांनी विरोधकाचे डिपॉझिट जप्त केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज संस्थेत मोठ्या मताने विजयी झालो, यश आले याचे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणुन समाधान आहे असे ते म्हणाले.
माझ्या आजोबाला मी जेव्हा 11 वर्षाचा होतो तेव्हा मी घरी जात असताना डॉ पाटील यांना पोलिस व्हॅनमध्ये घेऊन जात होते, त्या दिवशी मी देवासमोर शपथ घेतली होती, एक दिवस येईल की माझे बाबा निर्दोष सिद्ध होतील, कोर्ट हे निर्दोष करेल. 20 जुनचा निकाल समाधानाचा आनंदाचा होता, तो शब्दात सांगू शकत नाही, त्यांच्या संघर्षात मी सोबत होतो.
1974 मध्ये डॉ पाटील जिल्हा परिषद सदस्याल झाले तेव्हापासून जनतेने खुप प्रेम केले. आज मी लोकांची सेवा करण्यासाठी इथे उपलब्ध आहे. जनतेच्या सुख दुःखात काम करणे हे आमच्या रक्तात आहे. आमच्या पुढच्या पिढ्या लोकांची सेवा करण्यासाठी हजर राहणार आहोत. मला दुसऱ्याबद्दल व त्यांच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य वाटत नाही.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह, मुख्यमंत्री फडणवीस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे काम पाहून जनतेला विश्वास आहे. डॉ पाटील यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले असे कोर्टाने नमुद केले आहे, कट रचण्यात आला हे लोकांसमोर आले. आमचे पुर्ण कुटुंब समाधानी आहे. महायुती म्हणुन जेव्हा जेव्हा हात बळकट करण्याची वेळ येईल तेव्हा 100 टक्के कार्यकर्ता म्हणुन आम्ही पुर्ण काम करू असे पाटील म्हणाले.












