उस्मानाबाद, दि. 14:- जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
**********